🤦🏻♂️ *मला विहीरीला पाणी पाहिजे पण...शेतात पावसाच पाणी नको!*
*🤦🏻♂️मला शेतात जोमदार पीक पाहिजे पण...सुपीक जमीनीसाठी सेंद्रीय खते नको!*
*🤦🏻♂️मला बारमाही बागायती जमीन पाहिजे पण...जमीनीत ओढे ,नाले नकोत!*
*🤦🏻♂️ मला दुधासाठी,शेतीसाठी जणावरं पाहिजे पण...जनावरांना चरायला बांध नको!*
*🤦🏻♂️मला शेतीसाठी चांगला पाऊस पाहीजे पण...पावसासाठी निसर्ग संवर्धन नको!*
*🤦🏻♂️मला जगण्यासाठी फुकटचा ऑक्सीजन पाहिजे पण...ऑक्सीजन देणारी झाडे मला माझ्या शेतात नको!*
*🤦🏻♂️मला माझ्या शेतात जायला चांगला रस्ता पाहिजे पण...तोच रस्ता माझ्या शेतातुन नको!*
*🤦🏻♂️मला निरोगी जीवन ,सकस अन्न खाण्यासाठी पाहिजे पण...त्यासाठी विषमुक्त कमी ऊत्पादन देणारी सेंद्रीय शेती नको!*
*🤦🏻♂️ मला माझी शेती सपाट,बीना बांध ,बिना झाड पाहिजे पण...नदी,नाले,ओढे,बांध आणि झाडे नकोत!*
*🤦🏻♂️ मला गरज पडेल तीथे सावली पाहिजे पण...सावली देणारे झाड लावायला, वाढवायला नको!*
✌🏻
*सुपीक जमीन सकस अन्न होतं! वडील आजोबांच्या काळातील शेती आपण ठेवली नाही, मोठमोठी झाडे, मोठमोठी बांध, मोठमोठी ओढेनाले सपाट केले कुठे होते ठेवलेच नाही! जणावरं होती,शेण गोमुत्र दरसाल अमाप शेतात पडत होतं, रासायनिक खतांचा दाणा कसा असतो हे माहीती नव्हतं!*
*फवारणी कसी औषध रोगर आणि ऐंडोसल्फान शिवाय माहिती नव्हतं तेही क्वचीतच! आता बेसुमार रासायनिक खते, रासायनिक औषधं वापरुन नाशाकडे चाललेली शेती,भाजीपाला आणि फळे पिके!विषारी अन्न, विषारी रासायनिक पाणी आणि नापीक,खराब होत चाललेली जमीन.*
😇 *हे प्रकोप म्हणजे निसर्गाचे संकेत आहेत मानवा सुधर नाही तर निसर्गा समोर मानव शुन्य आहे...*
