महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
“महामुद्रा – प्रधानमंत्री मुद्रा योजना” वर आपले स्वागत आहे. मोबाइल फोन किंवा संगणकाद्वारे शक्य तितक्या कमी वेळेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्याची इच्छा असलेल्या लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. कर्ज मागणीचा अर्ज दाखल करणेसाठी आवश्यक कागदपत्रांची तसेच या प्रक्रियेबाबतच्या माहितीसाठी आता नागरिकाना बँकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन कधीही आणि कोठूनही माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे ज्यामुळे नागरिकांच्या वेळेची व श्रमाची बचत होऊ शकेल. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रधानमंत्री मुद्रा योजना अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या संकेतस्थळाची निश्चित मदत होणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख विविध व्यवसायासंबंधीची माहिती तसेच त्याचे प्रशिक्षण कोठून घ्यावे इत्यादी प्रकाराची माहिती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.
मुद्रा-दृष्टी, मुद्रा-मिशन आणि मुद्रा-उद्देश
मुद्रा–दृष्टी
समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धती आणि मानदंडांशी एकात्मिक आर्थिक आणि आधार सेवा प्रदाता बनून एक उत्कृष्टतेचे बेंचमार्क म्हणून काम करणे.
मुद्रा–मिशन
आर्थिक सहभाग आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याकरिता आमच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने एक समावेशक, स्थायी आणि मूल्य आधारित उद्योजकता संस्कृती निर्माण करणे.
मुद्रा–उद्देश
आमचे मूलभूत उद्देश म्हणजे भागीदार संस्थांचा आधार आणि प्रोत्साहन आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रासाठी वाढीचे पारिस्थित यंत्रणा निर्माण करून समावेशक आणि टिकाऊ पद्धतीने विकास साधणे.
शिशु : 50,000 / – पर्यंत कर्ज.
किशोर : 50,000 / – ते 5 लाखांपर्यंत कर्ज
तरुण : 5 लाखावरील आणि 10 लाखांपर्यंतची कर्ज.
सूक्ष्म पत योजना : सूक्ष्म पतपुरवठा योजना सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून (एमएफआय) द्वारे प्रामुख्याने विविध सूक्ष्म उद्योगांच्या उपक्रमांकरिता 1 लाख पर्यंतच्या कर्ज मागणीसाठी केली जाते. अर्थात, स्वयंसहाय्यता (SHG) सारख्या गटांद्वारे वैयक्तिक लाभार्थीना विविध लघु उद्योगासाठी वित्तीय साहाय्य कर्ज स्वरूपात देण्याची कार्यपद्धती यामध्ये समाविष्ट आहे. यासाठी सूक्ष्म कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना (एमएफआय) वेळोवेळी मुद्राकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
बँकांसाठी पुनर्वित्त योजना : विविध व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि अनुसूचित सहकारी बँका लघु उदयॊग व्यवसायासाठी कर्ज पूर्वहंता करणेकामी मुद्रा कार्यालयाकडून पुनर्वित्त उपलब्ध करून घेण्यास पात्र आहेत. पुनर्वित्त हे 10 लाख प्रति युनिट पर्यंतच्या मुदत कर्जासाठी आणि खेळते भांडवल कर्जासाठी उपलब्ध आहे. मुद्रा कार्यालयाने निश्चित केलेल्या धोरणानुसार ज्या बँकांनी मुद्रा कार्यालयाकडे पुनर्वित्त सुविधेसाठी नोंदणी केली आहे अशा बँका त्यांनी शिशु, किशोर व तरुण गटांतर्गत केलेल्या कर्ज रकमेसाठी पुनर्वित्त मुद्रा कडून उपलब्ध करून घेण्याची सुविधा आहे.
महिलांचे उद्योगासाठी वित्तपुरवठा कार्यक्रम: महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या बँका / एमएफआय महिला उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करणे अशा व इतर प्रकारच्या अतिरिक्त सुविधा पुरविण्याबाबत विचार करू शकतात. सध्या महिला उद्योजकांना कर्ज देत असलेल्या बँकांना व्याजदरात 25 बीपीएसची कपात मुद्राने केली आहे.
मुद्रा कार्ड : रोख पत (Cash Credit) स्वरुपात उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची सुविधा पुरविणारे मुद्रा कार्ड हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. मुद्रा कर्जांतर्गत खेळत्या भांडवलासाठी दिलेले डेबिट कार्ड आहे. कर्जदारास मुद्रा कार्डचा वापर हा गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा कर्ज रक्कम काढण्यासाठी करता येते. जेणेकरुन कर्ज रकमेचा उपयोग कार्यक्षम पध्दतीने व्यवस्थापित करुन व्याजाचा बोजा नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुद्रा कार्ड वापरामुळे मुद्रा कर्ज व्यवहाराचे डिजिटायझेशन होण्यास व कर्ज पूर्वइतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
Ref- https://mahamudra.maharashtra.gov.in
शिशू मुद्रा लोनवरील व्याजदरात २ टक्के कपात, जाणून घ्या काय आहे मुद्रा लोन योजना
Shishu Mudra Loan: कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने शिशू मुद्रा कर्जदारांना व्याजात २% सूट देण्याचा निर्णय घेतलाय.
Shishu loans under Pradhan Mantri Mudra Yojana: कोरोना संकट काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी २० लाख कोटी रुपयांची मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर आता केंद्र सरकार कोरोना संकटात छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिशू मुद्रा कर्जधारकांच्या (Shishu Mudra Loan) व्याजावर २% सूट (Interest Subvention) देण्यास मान्यता दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेज अंतर्गत याची घोषणा केली होती.
शिशू योजने अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत शिशू लोन घेतलेल्या कर्जदारांना त्यांच्या व्याजावर २ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूट १२ महिन्यांसाठी असणार आहे. म्हणजेच १ जून २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीपर्यंत ही सूट लागू असणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या शिशू श्रेणीतील लाभार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
काय आहे पंतप्रधान मुद्रा योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY)ची सुरूवात केली होती. या योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना दिले जाते. सरकारची ही योजना मुद्रा लोन नावाने प्रसिद्ध आहे. वाणिज्य बँक, ग्रामीण बँका, लघु कर्ज देणाऱ्या संस्था (एमएफआय) आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना या मुद्रा लोन अंतर्गत कर्ज दिले जाते. पंतप्रधान मुद्रा योजना शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण अशा तीन विभागात विभागली आहे.
१० लाख रुपयांपर्यंत मिळतं कर्ज
किशोर कर्ज योजने अंतर्गत ५०,००० रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. जर एखाद्या उद्योग सुरू करण्यासाठी पैशांची गरज असेल तर तो व्यक्ती तरुण लोन योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य घेऊ शकतो. तरुण लोन योजने अंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज केंद्र सरकार उपलब्ध करुन देते.
शिशू कर्जावर व्याजदर
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शिशू लोन अंतर्गत कर्ज घेतलेल्या नागरिकांना व्याज दरावर २ टक्क्यांची सूट मिळणार आहे. ही सूट पुढील १२ महिन्यांसाठी असणार आहे. या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या सर्व नागरिकांचे मिळून जवळपास १५०० कोटी रुपये वाचतील. व्याजाची ही रक्कम सरकार भरणार आहे. या निर्णयाचा लाभ जवळपास तीन कोटी नागरिकांना मिळणार आहे. सध्याच्या स्थितीत शिशू लोनवर १० ते ११ टक्के वार्षिक व्याज आकारला जातो. ज्यावर आता दोन टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
कोणत्या बँकेत मिळतं मुद्रा लोन
पंतप्रधान मुद्रा योजनेचं तीन विभागात वर्गीकर केले आहे. यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण कर्ज योजनेचा समावेश आहे. हे कर्ज तुम्हाला व्यापारी बँका, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँक, एमएफआय आणि एनबीएफसी यांच्याद्वारे उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष तेथे भेट देऊन कर्जाबाबतची माहिती मिळवू शकता.तसेच https://www.udyamimitra.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करु शकता. शिशू मुद्रा लोन योजनेत तुम्हाला हमीशिवाय सहज कर्ज मिळवू शकता.
Ref – timesnowmarathi.
कागदपत्रांची थोडक्यात यादी:
(कागदपत्रांची यादी केवळ सूचक आहे आणि संपूर्ण नाही आणि स्थानिक ठिकाणी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार जोडले जाऊ शकते)
१) ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅनकार्ड / आधार कार्ड / पासपोर्टची स्वत: ची प्रमाणित प्रत.
२) रहिवासाचा पुरावा – अलीकडील टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कराची पावती (२ महिन्यांपेक्षा जुनी नाही), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि मालक / भागीदार / संचालकांचे पासपोर्ट
३) अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / अल्पसंख्याकांचा पुरावा
४) व्यवसायाच्या एंटरप्राइझचा ओळखीचा / पत्त्याचा पुरावा – संबंधित परवाने / नोंदणी प्रमाणपत्र / व्यवसायाची मालकी, ओळख आणि पत्त्याशी संबंधित इतर कागदपत्रांच्या प्रती
५) अर्जदार कोणत्याही बँक / वित्तीय संस्थेत डिफॉल्टर असू नये.
६) अस्तित्त्वात असलेल्या बँकर्सकडून (असल्यास, मागील सहा महिन्यांपर्यंत) खात्यांचे विवरणपत्र.
७) मागील दोन वर्षांच्या युनिट्सची ताळेबंद व आयकर / विक्री कर रिटर्न इत्यादी (रु. २ लाख व त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू)
८) कार्यशील भांडवलाच्या मर्यादेच्या बाबतीत आणि मुदतीच्या कर्जाच्या कालावधीत कर्जाच्या कालावधीसाठी (रु. २ लाख व त्यावरील सर्व प्रकरणांसाठी लागू) प्रोजेक्ट केलेले ताळेबंद
९) अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात विक्रीची विक्री.
१०) तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचा तपशील असलेला प्रकल्प अहवाल (प्रस्तावित प्रकल्पासाठी).
११) कंपनीच्या सहकार्याचे निवेदन / भागीदारांचे डीड ऑफ पार्टनरशिप इ.
१२) तृतीय पक्षाची हमी नसल्यास संचालक व भागीदारांसह कर्जदाराचे मालमत्ता व दायित्वेचे विवरणपत्र निव्वळ किमतीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
१३) प्रोप्रायटर / पार्टनर / डायरेक्टर यांचे फोटो (दोन प्रती)
............................................................................................................................................
Mahamudra - Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY)
Welcome to "Mahamudra - Pradhan Mantri Mudra Yojana". The website is designed to bring people who want to get a loan under Pradhan Mantri Mudra Yojana to the bank through mobile phone or computer in the shortest possible time. Information on the documents required for filing a loan application as well as information on the process is now available to the citizens online anytime and anywhere through this website without going directly to the bank office which can save the time and labor of the citizens. This website will definitely help in making Pradhan Mantri Mudra Yojana more people-oriented, dynamic and transparent by using information technology. It is our intention to provide information on various employment and self-employment oriented occupations as well as information on where to get training etc. to the people who want to avail the benefits of the scheme through this website.
Mudra-vision, Mudra-mission and Mudra-purpose
Currency vision
To serve as a benchmark of excellence for the economic and social development of the society by becoming an integrated financial and support service provider with the best practices and norms in the world.
Money-mission
Creating an inclusive, sustainable and value-based entrepreneurship culture in collaboration with our partner organizations to achieve financial participation and financial security.
Currency-purpose
Our core objective is to support and promote partner organizations and to develop in an inclusive and sustainable manner by creating a growth ecosystem for the micro-industry sector.
Infant: Loan up to Rs. 50,000 / -.
Juvenile: Loan from Rs. 50,000 / - to Rs. 5 lakhs
Youth: Loans above Rs 5 lakhs and up to Rs 10 lakhs.
Micro Credit Scheme: Micro Credit Scheme is done by Micro Credit Institutions (MFIs) mainly for loan applications up to Rs. 1 lakh for various micro enterprise enterprises. Of course, this includes the process of providing financial assistance in the form of loans to various small businesses to individual beneficiaries through groups such as SHGs. For this, microfinance institutions (MFIs) are required to register with the currency from time to time.
Refinancing Scheme for Banks: Various Commercial Banks, Regional Rural Banks and Scheduled Co-operative Banks are eligible for refinancing from the Mudra Office for Pre-Loan for Small Business. Refinance is available for term loans up to Rs 10 lakh per unit and for working capital loans. As per the policy laid down by the Mudra Office, the banks which have registered with the Mudra Office for refinancing facility have the facility to avail refinancing facility from Mudra for the loan amount made by them under infant, juvenile and youth groups.
Women's Finance Financing Program: Banks / MFIs that provide financing to encourage women entrepreneurs may consider providing low interest rate loans to women entrepreneurs and other types of additional facilities. Banks currently lending to women entrepreneurs have reduced interest rates by 25 bps.
Mudra Card: Mudra Card is an innovative product that provides working capital facility to the industry in the form of Cash Credit. A currency is a debit card issued for working capital under a loan. The borrower can use the mudra card to withdraw the loan amount more than once as required. So that the loan amount can be used to control the interest burden by managing it efficiently. The use of Mudra card is useful for digitization of Mudra loan transactions and knowledge of loan history.
Ref- https://mahamudra.maharashtra.gov.in
2% reduction in interest rate on Shishu Mudra loan, find out what is Mudra loan scheme
Shishu Mudra Loan: The government is trying to help small traders cope with the Corona crisis. The government has decided to give 2% discount in interest to Shishu Mudra borrowers.
Shishu loans under Pradhan Mantri Mudra Yojana: During the Corona crisis, Finance Minister Nirmala Sitharaman announced a relief package of Rs 20 lakh crore. Since then, the central government has been trying to help small traders in the Corona crisis. The Union Cabinet has approved 2% interest prevention on Shishu Mudra Loan. The announcement was made by Finance Minister Nirmala Sitharaman under a Rs 20 lakh crore aid package.
Loans up to Rs. 50,000 under Shishu Yojana
After the Union Cabinet meeting, Union Minister Prakash Javadekar said that a decision has been taken to give 2 per cent discount on interest to borrowers who have taken child loans under the Prime Minister's Currency Scheme (PMMY). This discount will be for 12 months. This means that the discount will be applicable from 1st June 2020 to 31st May 2021. Beneficiaries in the Prime Minister's Currency Scheme are given loans up to Rs. 50,000 without any guarantee.
What is Prime Currency Scheme?
Prime Minister Narendra Modi had launched the Prime Minister's Currency Scheme (PMMY) on April 8, 2015. Under this scheme loans up to Rs. 10 lakhs are given to small and micro entrepreneurs. The government's scheme is known as Mudra Loan. Loans are provided under this currency loan to commercial banks, rural banks, micro lending institutions (MFIs) and non-banking financial companies. The Prime Minister's Currency Scheme is divided into three sections namely Child Loan, Juvenile Loan and Youth.
Loans up to Rs 10 lakh
Under Kishor Karz Yojana, loans ranging from Rs 50,000 to Rs 5 lakh are available. If one needs money to start an industry, one can get financial assistance under the youth loan scheme. Under the youth loan scheme, loans ranging from Rs 5 lakh to Rs 10 lakh are provided by the central government.
Interest rates on infant loans
Due to the decision taken by the central government, the citizens who have taken loans under the infant loan will now get a 2% discount on the interest rate. This discount is for the next 12 months. This decision will save about Rs 1,500 crore for all the borrowers. The government will pay the interest. About three crore citizens will benefit from this decision. At present, 10 to 11 per cent annual interest is charged on infant loans. Which is now discounted by two per cent.
Which bank do you get a currency loan from?
The Prime Minister's Currency Scheme is divided into three sections. This includes child, adolescent and youth loan schemes. These loans will be available to you through commercial banks, RRBs, small finance banks, MFIs and NBFCs or you can get information about the loans by visiting there directly. You can also apply online by visiting the website https://www.udyamimitra.in. In Shishu Mudra Loan Scheme you can easily get loan without guarantee.
Ref - timesnowmarathi.
Brief list of paper characters:
(The list of paper characters is indicative only and not exhaustive and can be added as needed in different locations as needed)
1) Proof of Identity - Self certified copy of Voter Identity Card / Driving License / PAN Card / Aadhar Card / Passport.
2) Proof of Residence - Recent Telephone Bill, Electricity Bill, Property Tax Receipt (not older than 2 months), Voter Identity Card, Aadhar Card and Passport of Owner / Partner / Director
3) Proof of Scheduled Castes / Tribes / OBCs / Minorities
4) Proof of identity / address of the business enterprise - Copies of relevant licenses / registration certificate / ownership of the business, identity and other documents related to the address
5) The applicant should not be a defaulter in any bank / financial institution.
6) Account statement from existing bankers (if any, up to last six months).
7) Balance of units for last two years and income tax / sales tax return etc. (Rs. 2 lakhs and above applicable for all cases)
8) Projected balance sheet in case of working capital limit and term loan period (applicable for all cases of Rs. 2 lakhs and above)
9) Sale in the current financial year till the date of submission of application.
10) Project report with details of technical and financial feasibility (for the proposed project).
11) Company Cooperation Statement / Deed of Partnership of Partners etc.
12) In case of no third party guarantee, an attempt may be made to obtain information on the net worth of the assets and liabilities of the borrower along with the directors and partners.
13) Photos of Proprietor / Partner / Director (two copies)
