महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था)
व्यावसायिक पायलट प्रशिक्षण प्रकल्प:-
प्रकल्पाचा तपशील :-
प्रस्तावना:-
महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याची चळवळ उभी केली. त्यातून बहुजन समाजाला आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतीक प्रगतीच्या वाटा सापडल्या व बहुजन समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार व कार्याचा हा वारसा महाराष्ट्र शासनाद्वारे पुढे नेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण २० विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत मोफत व्यावसायिक पायलट प्रशिक्षण ( कर्मशियल पायलट लायसन्स CPL ) देण्यास महाज्योतीच्या संचालक मंडळाने दि. ०७/०१/ २०२१ ते दि. ३१/०५/२०२१ रोजी मान्यता दिली आहे.
प्रकल्पाचा उद्देश:-
महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील या गटातील तसेच त्या गटातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे व्यावसायिक प्रशिक्षण विनाशुल्क देऊन तळागळातील विद्यार्थ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे व त्यायोगे त्यांच्या परिवाराच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीस महाज्योतीच्या वतीने हातभार लावणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
लाभार्थी निकष:-
१. उमेदवार हा भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा / असावी.
२. उमेदवार हा नॉन क्रिमिलेअर गटातील असावा / असावी.
३. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा / असावी.
४. उमेदवाराची वयोमर्यादा किमान १८ वर्षे ते २८ वर्षे असावा / असावी. (०१/०१/२०२२ रोजी)
५. उमेदवार हा १२ विज्ञान शाखेतून Physics, Chemistry व Mathematics हे विषय घेऊन पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा / असावी.
६. १२ विज्ञान शाखेतून Physics, Chemistry व Mathematics हे विषय घेऊन किमान ६५% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेला / झालेली ग्रामीण भागातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
७. १२ विज्ञान शाखेतून Physics, Chemistry व Mathematics हे विषय घेऊन किमान ७०% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेला / झालेली शहरी भागातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
८. जो उमेदवार हा १० वर्ग हा नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातून उत्तीर्ण झालेला झालेली असेल अश्या उमेदवारांना ग्रामीण क्षेत्रातील समजण्यात येईल.
प्रशिक्षण संस्था:-
नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर ( महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ) या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणाचा कालावधी:- १८ महिने
प्रशिक्षण शुल्क:- महाज्योती, नागपूर कडून प्रशिक्षण शुल्क भरण्यात येईल.
आरक्षित जागा:-
सामाजिक प्रवर्ग निहाय आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१. इतर मागास वर्ग:-
(एकूण आरक्षण टक्केवारी ५९%) एकूण आरक्षित जागा १२.
ग्रामीण क्षेत्रासाठी आरक्षित जागा ६, शहरी क्षेत्रासाठी आरक्षित जागा ६.
२. भटक्या जाती व विमुक्त जमाती:-
(एकूण आरक्षण टक्केवारी ३५%) एकूण आरक्षित जागा ७.
ग्रामीण क्षेत्रासाठी आरक्षित जागा ४, शहरी क्षेत्रासाठी आरक्षित जागा ३.
३. विशेष मागास प्रवर्ग
(एकूण आरक्षण टक्केवारी ६%) एकूण आरक्षित जागा १.
ग्रामीण किंवा शहरी क्षेत्रासाठी आरक्षित जागा १.
एकूण जागा:- २०
प्रवेश द्यावयाच्या एकूण २० जागांपैकी ५०% जागा ग्रामीण भागातील स्त्री व पुरुष उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे.
अर्जासोबत संकेतस्थळावर दिलेल्या ठिकाणी अपलोड करावयाची कागदपत्रे (मुळ प्रती):-
१. महाराष्ट्र राज्याचे डोमीसाईल ( अधिवास) प्रमाणपत्र.
२. जन्मतारखेचा दाखला.
३. १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट.
४. १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट.
५. मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य / राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र.
६. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitoner यांचेकडून Class II Medical Certificate व पोलीस विभागाकडून चरित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील. ( जे अंतिम निवड झालेले उमेदवार अनु. क्र. 7 मधील दोन्ही प्रमाणपत्रे विहित मुदतीत सादर करू शकणार नाहीत अश्या उमेदवारांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी प्रदान करण्यात येईल.
७. जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र.
८. आधार कार्ड.
सुचना:-
१. उमेदवारांची अंतीम निवड झाल्यानंतर वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी उपलब्ध करावी लागतील अंतीम निवड ही सदर पडताळणीच्या अधीन असेल.
२. अंतीम निवड झाल्यानंतर उमेदवाराने त्याचे नवीनतम म्हणजेच मागील एक महिण्याचे कालावधीतील काढलेल्या पासपोर्ट फोटोच्या १२ प्रती कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस सादर करावे.
निवड प्रक्रिया:-
१. चाळणी परीक्षा ही विभागीय पातळीवर घेण्यात येईल, त्यासाठी तज्ञ अनुभवी शिक्षकाकडून पेपर तयार करून घेण्यात येतील. यामध्ये समायोजित आवश्यक बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती, नागपूर यांच्याकडे असतील.
२. परीक्षा ही ७५ प्रश्नांची, १५० गुणांची व ९० मिनिटांची ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल, त्यात Physics करिता ३० गुण, Chemistry करिता ३० गुण व Mathematics करिता ४० गुण, English करिता २० गुण व Apptitude करिता ३० गुण असे एकूण १५० गुणांचा पेपर घेण्यात येईल. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन असेल.
३. अंतिम निवड ही चाळणी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर घेण्यात येईल.
४. उमेदवारांच्या प्राप्त अर्जातून उमेदवारास १२ वी ला प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार उमेदवारांना १:३० प्रमाणात चाळणी परीक्षेकरिता पात्र ठरविण्यात येईल.
५. अंतिम निवड यादी तयार करताना प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.
निवड रद्द करणे:-
उमेदवारांनी दाखल केलेली प्रमाणपत्रे चुकीची आढळल्यास, त्यांचे प्रशिक्षण काळात गैरवर्तन सिद्ध झाल्यास किंवा कोणत्याही समाजविघातक व देशविघातक कारवायांमध्ये लिप्त असल्याचे सिद्ध झाल्यास करण्यात आलेली निवड रद्द करण्यात येईल.
Web Site:- www.mahajyoti.org.in
Email:- mahajyotipilot@gmail.com
डॉ. बबनराव तायवाडे
संचालक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती), महाराष्ट्र राज्य नागपूर
मो. 9823314111
संकलन:-SHRI GAJANAN COMPUTERS,PARADH .
MO.9404038861
