📚 *महाराष्ट्रात CET परीक्षा कधी होणार? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वपूर्ण अपडेट!*
💁♂️ बारावी नंतर होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उपयुक्त अशा संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा कधी होणार याबाबत आता खुद्द राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे माहिती दिली आहे.
🗣️ *काय म्हणाले मंत्री सामंत* :
▪️ संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना सीईटी परीक्षेसंदर्भात प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
▪️ सीईटी परीक्षा या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकतात. अशी महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
▪️ तर परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पॅटर्न जेईई मेनच्यासारखा असेल. तसंच, जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीटसारखा असेल. असेही ते म्हणाले.
