खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ७६०० जागांची मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदाची भरती!
SGC Digital | करियर अपडेट
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने नव्याने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (अ तांत्रिक) आणि हवालदार पदांच्या जागांचा समावेश आहे. यामध्ये संपूर्ण भारतात ही भरती होणार असून ७ हजार ६०० पेक्षा अधिक जागा असल्याचे सांगितले जात आहे याची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहे २३ मार्च २०२२ रोजी याची प्रक्रिया सुरू होईल. ( Good news for 10th passers! Recruitment of 7600 posts of Multi-Tasking Staff and Constable through Staff Selection Commission!)
यातील भरतीसाठी उमेदवार हा किमान दहावी पास अथवा तत्सम विद्यालयाचा उत्तीर्ण असावा. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करता कमीत कमी १८ वर्षे व कमाल २५ वर्षाची वयोमर्यादा आहे. याची भरती प्रक्रिया व परीक्षा पद्धत ही संगणक आधारित चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी ही हवालदार पदासाठी असेल, तर मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नपत्रिका ची असेल.
या भरती प्रक्रियेसाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपये परीक्षा शुल्क असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत असणार आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
याची परीक्षा केंद्रे ही पश्चिम विभागाकरिता म्हणजे महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमन आणि दिव या भागासाठी औरंगाबाद, अमरावती, जळगाव, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक अशी असणार आहेत. याकरिता विभागीय अधिकारी अथवा त्या वेबसाईट साठी संपर्क करिता reasonal director, staff selection commission, first floor, South wing, Pratiksha bhavan, 101 mahrshi Karve road, Mumbai, Maharashtra 400020. ( http://www.ssc.nic.in)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा:- श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध मो.7709262657
