👍 अखेर ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच...
🎯 दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत दिली.
💁♂️ मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार? यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला आहे.
🗣️ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य नसेल.
👉 *बारावीची परीक्षा कधी?* :
▪️ लेखी परिक्षा : 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान
▪️ प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा : 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत
👉 *दहावीची परीक्षा कधी?* :
▪️ लेखी परीक्षा : 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान
▪️ प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा: 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान
📍 *इतर महत्वाच्या बाबी* :
▪️ यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे.
▪️ ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
▪️ 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळेल.
▪️ 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.
▪️ रिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील.
▪️ प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील.
▪️ जर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर, त्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा पेपर देता येईल.
💫 दरम्यान परिक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार असल्याचंही शिक्षण विभागाने सांगितलं आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलन :-श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध. मो.9404038861
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
