नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया केंद्र सरकारची अभिनव स्पर्धा ज्यात आपण घर बसल्या रांगोळीचे फोटो काढून या स्पर्धेत सहभागी होऊन सहा लाखापर्यंत बक्षीस कशी मिळवू शकतो?
SGC Digital या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळण्यासाठी आमचा ब्लॉग ला फॉलो करा.
रांगोळी कलाकारांना सुवर्णसंधी:-
भारत सरकारच्या वतीने देशभरातील रांगोळी कलाकारांसाठी अत्यंत अमुल्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्कृती मंत्रालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे झाल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने वेगवेगळ्या खात्याच्या योजनांमधून स्वातंत्र्यातील वेगवेगळ्या प्रसंगांचे लेखन चित्रण केले जात आहे सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे हा भारत सरकारचा या कार्यक्रमा मागे लिहितो आहे.
संस्कृती मंत्रालयाच्या वतीने रांगोळी कलाकारासाठी खूप चांगली संधी रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे यामध्ये ऑनलाइन पद्धतीने स्पर्धेमध्ये सहभागी होणे असल्यामुळे आपण आपल्या घरी 4 फूट रुंद आणि 4 फूट उंच अशी 4 बाय 4 आकाराची रांगोळी काढावयाची आहे.
या रांगोळी स्पर्धेचे जिल्हास्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्थर अशा तीन पातळीवर स्पर्धा घेतली जाणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केलेले असल्यामुळे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आपण लक्षपूर्वक माहिती करून घेणे गरजेचे आहे.
रांगोळी काढत असतानाचा एक फोटो 75℅ रांगोळी पूर्ण होताना स्पर्धक आणि रांगोळी असा फोटो घ्यावा आणि रांगोळी पुर्ण झाल्यानंतर चा एक फोटो संपूर्ण रांगोळीचा घ्यावा असे दोन फोटो सोबतच्या लिंक वर अपलोड करणे आहे......
या स्पर्धेचे पहिले पारितोषिक 6 लाख रुपये असून सोबत दिलेल्या गुगल फार्म वाचल्यानंतर या विषयीची सर्व माहिती आपणास मिळणार आहे आपण सर्व रांगोळी कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या कलेचा आविष्कार भारत सरकार पर्यंत पोहोचवा रांगोळी अपलोड केल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर आपले प्रमाणपत्र दिले जाईल ऑनलाइन पद्धतीने सर्व कारभार असल्यामुळे आपल्या घरी बसून आपण रांगोळी काढावी आणि आपल्या इतर सहकार्यांना सांगावे.
www.amritmahotsav.nic.in
या लिंक वर रांगोळी सह दोन फोटो अपलोड करून आँनलाईन फार्म भरल्यानंतर ओटीपी नंबर येतो. तो दिला की ई सर्टिफिकेट लगेच त्या मोबाईल नंबर वर येते. म्हणजे आपले रजिस्ट्रेशन झाले. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत आहे. आपण आपल्या घरी रांगोळी काढून सहभागी होऊ शकता कोणतेही बंधन नाही.फक्त 10 वर्षा वरील कुणीही भाग घेऊ शकता.
देश के नाम एक रंगोली सजाओ
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तरावरील बक्षिसे:-
1)10,000₹
2)5,000₹
3)3,000₹
या स्पर्धेसाठी असणारी राज्यस्तरिय बक्षिसे:-
1)₹1लाख
2)₹75,000
3)₹50,000
आणि राष्ट्रीय स्तरावरील पाच बक्षिसे:-
1) ₹6लाख
2)₹5लाख
3)₹4लाख
4)₹3लाख
5)₹2लाख
====================================================================
रांगोळीचे फोटो काढून ऑनलाइन पाठवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि
ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा. 🙏🙏
👇👇👇
संकलन:-श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध.
Mo.9404038861

