💁🏻♂️ कोरोनामुक्त गाव 🏆पुरस्कार योजना‼️
📢 Govt.Schemes
💁🏻♂️राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरु केली आहे.
*📝गुणांकनासाठीचे निकष व कमाल गुण* :
ग्रामपंचायत स्तरावर 5 पथकांनी नेमून दिलेली कार्ये नियमितपणे करायची आहेत. त्याआधारे ग्रामपंचायतीने खालील निकषांनुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीचे स्वयंमूल्यांकन करून ते गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे. विविध 22 निकषांवर 50 गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
*🏆स्पर्धेचे 22 निकष* : (गुणांकन)
🔸1) कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे.(2)
🔹2) पथकांची निर्मिती करणे.(2)
🔸3) कोरोनाबाधित गावांचे सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे.(4)
🔹4) गावपातळीवर अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करणे.(4)
🔸5) बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल करणे.(2)
🔹6) लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवणे.(2)
🔸7) यासाठी अल्पदरात वाहनव्यवस्था करणे.(2)
🔹8) विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करणे, शौचालयाची नियमित स्वच्छता.(2)
🔸9) गावातील खासगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सक्रीय सहभाग घेणे, लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्मितीसाठी आहारविषयक मार्गदर्शन.(2)
🔹10) कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह असल्यास पथकातील स्वयंसेवकांमार्फत मदत करणे.(2)
🔸11) शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटीव्ह आल्यास त्यांच्याकडील उत्पादित दूध व भाजीपाला हे अनुक्रमे दूध डेअरी व मार्केटला स्वयंसेवकांमार्फत पोहोच करणे.(2)
🔹12) सहकारी संस्था, बचतगट यांचा सहभाग घेणे.(2)
🔸13) कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे.(2)
🔹14) कोरोनाविरहित कुटुंबांची नोंद ठेवणे व काळजी घेणे.(2)
🔸15) संबंधित पथकातील स्वयंसेवकांमार्फत बाधितांच्या उपचारासाठी व्यवस्था करणे.(2)
🔹16) लसीकरणासाठी मदत करणे, उपलब्ध लसीचे शासकीय नियमानुसार योग्य वाटप करणे(2)
🔸17) लहान बालकांचे, गरोदर महिलांचे सर्वेक्षण करणे.(2)
🔹18) जनजागृतीसाठी विविध प्रभावी उपाययोजना, विविध तंत्रज्ञानाचा वापर.(2)
🔸19) नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य ती खबरदारी घेणे(2)
🔹20) मृत्यूदर कमी असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न.(2)
🔸21) पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे.(2)
🔹22) कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झालेल्या अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणे. (4)
*🏆स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींची कर्तव्ये* :
🔸1 जून 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येईल.
🔹1) प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक.
🔸2) विलगीकरण कक्ष स्थापना व कार्यवाही पथक.
🔹3) रुग्णालयांसाठीचे वाहन चालकाचे पथक.
🔸4) कोविड हेल्पलाईन पथक.
🔹5) लसीकरण पथक.
💁🏻♂️स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येक महसूल विभागात पुढील प्रमाणे बक्षिसे व गावांच्या विकासासाठी निधी दिला जाणार.
*🏆पुरस्कार*
🥇प्रथम
50 लाख + 50 लाख = 1 कोटी
🥈द्वितीय
25 लाख + 25 लाख = 50 लाख
🥉तृतीय
15 लाख + 15 लाख = 30 लाख
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
💁🏻♂️ _*सहकार्य करा हा मॅसेज🤳इतरांना पण शेअर करा*
=======
